News Flash

आ.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून दहा रुग्णांना आठ लाखांची मदत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातून कोल्हापूर शहरामध्ये विविध आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याकरिता हजारो रुग्ण दाखल होत असतात. त्यातील बहुतांश रुग्ण हे सर्वसामान्य गरीब घरातील असतात. या रुग्णांना उपचारा अभावी परतावे लागू नये, त्यांना दिलासा मिळावा या सामाजिक भावनेतून आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने गेल्या सात वर्षामध्ये साडेआठ हजार रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करणेत आल्या आहेत. त्याचबरोबर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी मंजूर करून रुग्णांना आधार देण्याचे काम करण्यात आले आहे. अशाच दहा रुग्णांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे आठ लाख रुपयांची मदत करण्यात आली. गेली आठ वर्षे सुरु असलेली रुग्णसेवा अशीच अविरतपणे सुरु ठेवून, सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्याचे काम यापुढेही करणार असल्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. आज (रविवार) शिवसेना शहर कार्यालय येथे लाभार्थी रुग्णांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत पत्राचे वाटप करण्यात आले, याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून उपचार करून घेणाऱ्या तसेच आर्थिक मदतीचा लाभ घेणाऱ्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांनाही मदत केली जाते.

यावेळी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, या महागाईच्या काळामध्ये विविध आजार, अपघात यांच्यावर वैद्यकीय खर्च करणे गोरगरिबांना न पेलवणारे आहे. त्यांची परिस्थिती हलाखीची असल्यास उपचारासाठी उसनवारी करुन पैसे जमा केले जातात. अशा या रुग्णांना दिलासा देण्याचे काम आमचे फौडेशन गेले सहा ते सात वर्ष करीत आले आहे. मेंदू, हृदय विकार, किडनी, कॅन्सर, पोट विकार, मणक्याचे विकार, हात- पायावरील शस्त्रक्रिया आदी महागड्या विकारांवरील शस्त्रक्रिया किवा उपचार घेताना रुग्णाच्या नाकीनऊ येतात. अशा रुग्णांना नाममात्र कागदपत्रे तयार करून मुंबई, पुणे सारख्या शहरातील मुंबई हॉस्पिटल, टाटा, हिंदुजा, लीलावती, ब्रीच कॅन्डी, गुरुनानक, कोकिळाबेन अंबानी, जे.जे. हॉस्पिटल, पुणे शहरातील संचेती, रुबी, आधी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येते. या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात त्यामुळे फौंडेशन मार्फत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापुरातील अॅपल सरस्वती, प्रभू, अॅस्टर आधार आदी प्रसिद्ध रुग्णालयांमध्येहि अशा पद्धतीच्या मोफत शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. त्याच बरोबर मुंबई, पुणे आदि ठिकाणी जाणे शक्य नसलेल्या रुग्णांना किंवा योजनेत बसू न शकणाऱ्या काही आजारावरील रुग्णांना त्यांच्या शस्त्रक्रियांकरिता मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी तून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येते. याचाही लाभ अनेक रुग्णांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!