News Flash

हा तर फक्त ट्रेलर आहे – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : हा विजय म्हणजे ट्रेलर आहे. मोदींनी दिलेला विकास आणि विश्वास, अमित शहांचं संघटन यामुळे भाजपला त्रिपुरा, नागालँडमध्ये विजय मिळवता आला, ही प्रतिक्रिया आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. भाजपच्या विजयोत्सवानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘गुजरात, हिमाचल, त्रिपुरा या तीनही राज्यात जनतेने 49 ते 50 टक्के मते दिली आहेत. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाय. आदिवासी समाजाने मोदींवर मोठा विश्वास दाखवला आहे.
जे मोदींच्या नेतृत्वावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हा विजय त्यांना उत्तर आहे, असंही ते म्हणाले. भारताचा विश्वास मोदींवर आहे, भाजपच कर्नाटक निवडणूक जिंकणार आणि 2019 मध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एवढे यश कधीच कुणाला मिळाले नाही, मोदींची गरीब कल्याण नीती देशाला भावली आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!