News Flash

घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांचे ५६ हजार कोटी बुडाले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सगळय़ात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेत १२ हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा उघड झाल्यानंतर सरकारी बँकांचे शेअर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत आहेत. १४ फेब्रुवारी रोजी हा घोटाळा प्रकाशात आल्यानंतर ११ सरकारी बँकांना प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. गुंतवणूकदारांचे तब्बल ५६ हजार २५१ कोटी रुपये बुडाले आहेत. पीएनबी घोटाळय़ाचा हा साइड इफेक्ट आणखी दोन ते तीन महिने शेअर बाजारावर राहणार असल्याने गुंतवणूकदारांनी काही काळ शेअर बाजारापासून दूर राहण्याचा सल्ला अर्थतज्ञांनी दिला आहे. सर्वाधिक नुकसान पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला भोगावे लागले आहे. गेल्या महिनाभरात पीएनबी बँकेतील घोटाळय़ाचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याने सातत्याने शेअर बाजारात घसरण सुरू आहे. मोठय़ा संख्येने बँकांचे शेअर दिवसेंदिवस गडगडत आहेत. शेअर बाजारातील सध्याच्या घडामोडी पाहता आणखी काही काळ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करू नये, असा सल्ला अर्थतज्ञांनी दिला आहे.
पीएनबी बँकेला ११ हजार ४०० कोटींना बुडवणारा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या विरोधात पीएमएलए (आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा) न्यायालयाने अजामीनपात्र अटकवॉरंट जारी केले आहे. २८ फेब्रुवारीला ‘ईडी’ अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने दोघांच्याही ४१ स्थावर मालमत्तांवर टाच आणली असून या संपतीचे बाजारमूल्य १२१७.२० कोटी रुपये इतके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!