News Flash

मेघालयमध्ये काँग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा

शिलाँग (वृत्तसंस्था) : गोवा आणि मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मेघालय विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी दावा केला आहे. काँग्रेसचे मेघालय प्रदेशाध्यक्ष विन्सेंट पाला आणि महासचिव सी. पी. जोशी यांनी राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी पत्र दिल आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे संविधानिक नियमानुसार काँग्रेसला लवकरात लवकर सरकार बनविण्यासाठी निमंत्रण द्यायला हवे. निश्चित तारखेला विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करू, अस या पत्रात नमूद करण्यात आल आहे. एकीकडे पाला आणि जोशी यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेसाठी दावा केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कमलनाथ आणि मुकुल वासनिक यांनी इतर पक्ष आणि अपक्षांशी चर्चा करून पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सरकार बनविण्यासाठी पुरेस संख्याबळ मिळविण्यासाठी इतर पक्षांशी संपर्क साधल्याचही त्यांनी स्पष्ट केल आहे. ६० सदस्य संख्या असलेल्या मेघालय विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. बहुमतांसाठी ३१ जागांची आवश्यकता असल्याने दहा आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी काँग्रेसने जोर बैठका सुरू केल्या आहेत. तर नॅशनल पीपल्स पार्टीला १९ जागा मिळाल्या असून भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!