News Flash

चहा विक्रेत्याचे उत्पन्न ऐकून बसेल तुम्हाला धक्का !

पुणे (प्रतिनिधी) : एका चहा विक्री करणाऱ्या माणसाचे उत्पन्न किती असू शकते? पुण्यात एका चहा विक्रेत्याच महिन्याच उत्पन्न ऐकून आपणास धक्का बसेल. कारण, हे चहा विक्रेते महिन्याला एक दोन नव्हे तर तब्बल १२ लाख रुपये कमावतात. नवनाथ येवले असे या चहा विक्रेत्याच नाव असून, ते पुण्यात ‘येवले टी हाऊस’ या नावाने चहा विकतात.

त्यांच्या येवले टी हाऊसचे सध्या पुण्यात तीन स्टॉल असून, प्रत्येक टी हाऊसमध्ये १२ लोक काम करतात. त्यांच्या चहाच्या चवीमुळे येवले टी हाऊस हे सर्वच चहाप्रेमींचे आवडीचे ठिकाण बनले आहे. अनेक पुणेकर या टी हाऊसला भेट देऊन, चहाचा अस्वाद घेतात.

नवनाथ येवले यांनी एनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत येवले टी हाऊसचा ब्रँड संपूर्ण जगभरात पोहोचवायचा असल्याचं सांगितलं आहे. तसेच, “पकोडे विकून जितका रोजगार उपलब्ध होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात चहा विकून रोजगार मिळत असल्याचं,” त्यांनी स्पष्ट केलं.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘पकोडे विकणे हा देखील एक प्रकारचा रोजगार असल्याचे’ वक्तव्य केल होत. त्यांच्या या वक्तव्याचा अनेक युवक संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. तर विरोधकांनी यावरुन मोदींवर टीकेची झोड उठवली होती.

One thought on “चहा विक्रेत्याचे उत्पन्न ऐकून बसेल तुम्हाला धक्का !”

  1. आमाल टी हाऊस सुरू करायाच मदत भेटेल
    नबर आसेल तर सागा 9960096701

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!