News Flash

नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांनी फिरवली पाठ !

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सहभाग असलेल्या ‘सेव्ह रिव्हर’ या व्हिडिओवर काँग्रेसने निशाणा साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘नद्या पुनर्जीवन संकल्प कार्यक्रमा’ला जाणेच टाळले. मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी मात्र या कार्यक्रमाला हजेरी लावली.
मुंबईत दहीसरमध्ये आज सकाळी सात वाजता ‘नद्या पुनर्जीवन संकल्प कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री या कार्यक्रमाला गेलेच नाहीत. व्हिडिओत झळकलेले अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस आणि भाजप आमदार राम कदम मात्र कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘सेव्ह रिव्हर’ या व्हिडिओवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. या व्हिडिओत महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलिस आयुक्त यांचाही समावेश आहे. मात्र अशा खासगी कंपनीच्या व्हिडिओत प्रशासकीय अधिकारी कसे सहभागी होऊ शकतात? असा सवाल काँग्रेसने उपस्थित करत कारवाईची मागणी केली. या व्हिडिओची निर्मिती करणारी संस्था भाजपशी संबंधित असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.

दरम्यान, हा व्हिडिओ सरकारने तयार केलेला नसून, ‘रिव्हर मार्च’ या सामाजिक संस्थेने केल्याचे स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आले. नदी शुद्धीकरण आणि पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची गरज असल्यामुळेच मुख्यमंत्री आणि अन्य प्रशासकीय अधिकार्यांानी त्यांच्या विनंतीला होकार देऊन यात सहभाग घेतला. लोकोपयोगी कार्यासाठी उपक्रम व्यावसायिक नसेल तर शहराचे नागरिक म्हणून अधिकारी त्यात सहभागी होऊ शकतात असे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!