News Flash

साखरपा येथे कार अपघातात महिला ठार

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर साखरपा (ता. संगमेश्वर) येथे आज (रविवारी) पहाटे झालेल्या कार अपघातात पद्मा मांगले (४२) ही महिला जागीच ठार झाली. तर त्यांचे पती महेश मांगले (४६) गंभीर जखमी झाले. हे दांपत्य कोल्हापूरहून अगरबत्ती खरेदी करुन देवरुखला जात होते.

महेश मांगले यांचा देवरुख येथे अगरबत्तीचा व्यवसाय आहे. शनिवारी ते पत्नीसह कोल्हापूरला गेले होते. रात्री ११.३० वाजता तेथून निघाले. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास साखरपा जाधववाडी येथे एका वळणावर त्यांची नॅनो कार मोरीवरील पुलावरुन खाली कोसळली. त्यात पद्मा मांगले या जागीच ठार झाल्या. महेश मांगले गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रत्नागिरीला हलवण्यात आले आहे. पद्मा मांगले या संगमेश्वर तालुक्यातील सायले प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!