News Flash

क्रीडाईचे निखिल पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील कुबेर कन्स्ट्रक्शन्सचे संस्थापक व क्रीडाई गडहिंग्लजचे संचालक निखिल पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला. आज दिवसभर गडहिंग्लज मधील अनेक मान्यवरांनी कुबेर कन्स्ट्रक्शन्स येथील ऑफिसला जाऊन शुभेच्छा दिल्या.
बांधकाम क्षेत्रातील कामगारांना उन्हाळ्याच्या दिवसात टोप्या वाटप करून एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. तसेच मूकबधिर शाळेमधील मुलांना फळ वाटपाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला.
कार्यक्रमास क्रीडाई गडहिंग्लजचे अध्यक्ष भास्कर पाटील, सचिव विरुपाक्ष पाटणे, सेंटरिंग संघटनेचे अनिल गायकवाड, आर्किटेक्टअँड इंजीनियर्स असोशियशन चे अध्यक्ष शैलेंद्र कावनेकर, ए. व्ही. पि ग्रूपचे अनुप पाटील, कुबेर कन्स्ट्रक्शन्सचे पदाधिकारी व स्टाफ व गडहिंग्लज नगरातील बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्वजन उपस्थित होते.

One thought on “क्रीडाईचे निखिल पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!