News Flash

सहकार चळवळीत आता दुधसंस्थाच सक्षम ठरत आहेत : अरूणकुमार डोंगळे

गुडाळ (प्रतिनिधी) : साखर उद्योग अडचणीत असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला गोकुळने दुधदर आणि दरफरकाच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम केले असून सहकार चळवळीत आता दुधसंस्थाच सक्षम ठरत आहेत असे प्रतिपादन गोकुळचे संचालक अरुणकुमार डोंगळे यांनी केले.

आणाजे ता. राधानगरी येथे कै. बंडा बाळा पाटील दूध संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या सभासदांना भेट वस्तू वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. उपस्थितांचे स्वागत हिंदुराव जाधव यांनी केले.
संस्थेचे चेअरमन आणि माजी सरपंच दत्तात्रय पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी माजी सभापती कै बंडा बाळा पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन माजी आमदार नामदेवराव भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले. दुधसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना अरूण डोंगळे यांच्या हस्ते जाजम वाटप करण्यात आले. संस्थेच्या प्रवर्तक मंडळाचा सत्कार माजी आमदार नामदेवराव भोईटे यांच्या हस्ते घड्याळ वाटप करून करण्यात आला.

या कार्यक्रमास भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक डी बी पाटील, आमजाई व्हरवडेचे सरपंच राजेंद्र चौगले, आकनूरचे सरपंच राजेंद्र चव्हाण, गोकुळ विस्तार अधिकारी उदय पाटील, आदी मान्यवरांसह संस्थेचे सर्व संचालक, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!