News Flash

क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटिबध्द ; व्यक्तीगत पातळीवरही प्रयत्नशिल : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सन २०२० मध्ये होणाऱ्या ऑलंपिक स्पर्धेत जास्ती जास्त यश मिळविण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन करुन खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा गौरव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त विजेत्यांचा गौरव करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात पुण्यानंतर सर्वाधिक 23 पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याला प्राप्त झाल्याने विशेष आनंद होत आहे. पुरस्कारामुळे व्यक्तीगत जीवनात एक उंची गाठली जाते पण 23 शिव छत्रपती पुरस्कार जिल्ह्याला प्राप्त झाल्याने कोल्हापूर
जिल्ह्याचाही मान उंचावला आहे. क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी शासन विविध निर्णय घेत आहे. चांगले अनुभवी प्रशिक्षक, अत्याधुनिक क्रिडा साधने, खेळाडूंची मनोबल उंचावण्यासाठी थेट नोकरी अशा अनेक निर्णयांचा यामध्ये समावेश आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना थेट नोकरी देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे, त्यातून अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळेल. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून जिल्हा नियोजन मधून क्रिडांगणासाठी व क्रिडा साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या शिवाय आर्थिक
कारणास्तव कोणताही गुणवंत खेळाडू मागे पडणार नाही यासाठी मी स्वत: व्यक्तीगत पातळीवर प्रयत्नशिल आहे. सन २०२० मध्ये होणाऱ्या ऑलंपिक क्रिडा स्पर्धेसाठी जास्ती जास्त खेळाडूंवर लक्ष केंद्रीत करुन अधिकाधि पदके जिल्हा, राज्य व देशाला मिळवून देण्यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करुया असे, आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिव छत्रपती राज्य क्रिडा जीवन गौरव पुरस्कारासाठी बिभीषण पाटील यांची
एक मताने समितीने निवड केल्याचा उल्लेख त्यांनी अवर्जुन केला तसेच सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. यावेळी पुरस्कारार्थींना मानपत्र, शाल व भेट वस्तु देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
यावेळी पुरस्कारार्थींना मानपत्र, शाल व भेट वस्तु देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते
गौरविण्यात आले. यावेळी क्रिडा मार्गदर्शक म्हणून अजित पाटील, चंद्रकांत चव्हाण, प्रदीप पाटील यांचा तर खेळाडू म्हणून मंदार दिवसे, विजय मोरे, ओमकार ओताडी, गणेश माळी, अनिल पवार, नलिनी डवर, सचिन पाटील, विक्रम इंगळे, रोहित हावलदार, अजिंक्य रेडेकर, कौतुक डाफळे, स्वप्निल कुसाळे, ऋचा पुजारी, प्रिती इंगळे, विक्रम कुऱ्हाडे, अमित निंबाळकर, अभिषेक जाधव, शुक्ला बिडकर यांचा तर संघटक कार्यकर्ता म्हणून संभाजी वरुटे यांना शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त
झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!