News Flash

आई आणि मुलांनी दिली दहावीची एकत्र परीक्षा

कोल्हापूर (मोहन कारंडे) : प्रतिकूल परीस्थितत शिक्षण सोडाव्या लागलेल्या अनेक महिला शिक्षणाचे हेच स्वप्न मुलांमध्ये रुजवतात. मुलांनी शिकून मोठे व्हावे यासाठी आयुष्यची संपूर्ण शिदोरी पणाला लावतात. पण शिक्षण माणसाला आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शांत बसू देत नाही. याचेच उदाहरण सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगरूळ येथील परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले. गुरुवार पासून सुरू झालेल्या दहावीची परीक्षा देण्यासाठी आपल्या मुलांबरोबर जयश्री कुंभार (रा. सांगरूळ) व मनीषा नलवडे (रा.गणेशवाडी) या दोन्ही मातांनी परीक्षा केंद्रावर हजेरी लावल्याने पर्यवेक्षक, सुपरवायझर व इतर मुलांमध्ये हा विषय चर्चेचा पण विद्यार्थ्याना एक नवीन प्रेरणा देणारा बनला.
सांगरूळ येथील लताबाई सर्जेराव ताकमारे हे माहेरचे नाव असलेल्या नावावर दहावीच्या परीक्षेला बसलेल्या मनीषा महादेव नलवडे (रा. गणेशवाडी, ता. करवीर) या परीक्षा केंद्रावर गुरुवारी मराठीच्या पहिल्या पेपरला आल्यानंतर त्यांच्याकडे बघून इतर सर्वच मुलांच्या भूवया उंचावल्या. मनीषा या सध्या आशा वर्कर म्हणून काम पाहतात. त्यांचा आदित्य नलवडे हा मुलगा दहावीची परीक्षा देत आहे. तर महेश नलवडे हा दुसरा मुलगा बारावीची परीक्षा देत आहे. तसेच सांगरूळ येथील जयश्री तानाजी कुंभार या अंगणवाडी सेविका आहेत. त्यांची मुलगी श्रद्धा ही १२ वीची परीक्षा देत आहे, तर पुतण्या प्रसाद कुंभार १० वी ची परीक्षा देत आहे. जयश्री यांनी एस.वाय.बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पण दहावीच्या परीक्षेच्या प्रमाणपत्राशिवाय अडचणी निर्माण होत असल्याने पतीच्या प्रेरणेने त्यांनी दहावीसाठी १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा देण्याचा निश्चय केला. ग्रामीण भागात शक्यतो मुलींना शिक्षण देण्याबाबत पालकांमध्ये अनुत्सुकता असते शिवाय प्रतिकूल परीस्थिती आणि अल्पवयातच होणारे लग्न यामुळे मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांवर पाणी फेरले जाते. पण या धाडसी मातांच्या शिक्षणाच्या ओढीने अनेकांच्या समोर मात्र आदर्श ठेऊन दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!