News Flash

महाराष्ट्र सरकारच्या योजनांचा जनतेने लाभ घ्यावा : चंद्रकांतदादा पाटील

हलकर्णी ( प्रतिनिधी ) : सरकारच्या अनेक योजना आहेत याचा सर्वानी लाभ घ्यावा असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले. चंद्रकातदादा पाटील बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे आज (शनिवार) रोजी झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत समाधान योजना कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. डॉ.राजेंद्र हिरेमठ (सी.ओ.ई.पी.पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. मुख्याध्यापक निकम सर यांनी स्वागत केले.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सरकारच्या नवनवीन योजना चांगल्या आहेत पण या जनतेपर्यंत व गावामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे. सध्या शेतकऱ्यांची शेतीसाठी लागणारी आध्यावत वाहने शेतापर्यंत जाण्यासाठी पाणंद रस्तेसाठी नवीन योजना चालू केली आहे. तसेच प्रत्येक कुंटुबाला वैद्यकीय उपचाराकरिता पंतप्रधान योजनेतून पाच लाख देण्यात येणार आहेत. सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात व त्यासाठी लागणारी माहिती एका ठिकाणी मिळावी यासाठी समाधान योजना कार्यक्रम हाती घेतला असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी चंद्रकांतदादा पाटील त्यांनी केले.
यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसिलदार राजेश चव्हाण,गटविकास अधिकारी सीमा जगताप, बसर्गे सोसायटी अध्यक्षा श्रीमत वर्षादेवी नाडगोडे, प्रकाशराव चव्हाण, हेमत कोलेकर,रेखा हत्तरगी,उपसभापती बनश्री चौगुले, समाजरत्न डॉ. गंगाधर व्हस कोटी ,पं.स.सदस्य इराप्पा हसुरे,रूपाली कांबळे,प्रदीप जगदाळे,मारूती राक्षे,एम.डी.पाटील,यांच्यासह मंडल आधिकारी,सरपंच,उपसरपंच सदस्य व नागरिक उपस्थित होते.

One thought on “महाराष्ट्र सरकारच्या योजनांचा जनतेने लाभ घ्यावा : चंद्रकांतदादा पाटील”

  1. उपक्रम छान आहे पण गावातील पुढार्यानी तो सर्व जनतेला समजावून सांगितले पाहिजे गावातील पुढारी फक्त स्वतःच्या कार्यकर्त्याला फक्त लाभ मिळवून देतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!