News Flash

स्मशानभुमीच्या विस्तारीकरणाबाबत महापौर स्वाती यवलुजे यांनी केली पाहणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगा स्मशानभुमीच्या विस्तारीकरणबाबत आज महापौर सौ.स्वाती यवलुजे, आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी व पदाधिकारी यांनी स्मशानभूमीस भेट देवून पाहणी केली. पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरणाचा आराखडा लवकरात लवकर महासभेस सादर करुन राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सुचना संबंधीत अधिकाऱ्यांना महापौर सौ.स्वाती यवलुजे यांनी दिल्या.
२० फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या महासभेत डी वॉर्ड, रिसनं. २१ (पैकी) मिळकत कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या सुधारीत मंजूर विकास योजनेमध्ये ना विकास विभाग मधून वगळून स्मशानभूमीच्या विस्तारासाठी फेरबदलाच्या कारवाईसाठी महासभेसमोर ठेवण्यात आला होता. यावेळी महासभेमध्ये सदरची 6 एकर जागा प्रस्तावीत आहे त्यापैकी स्मशानभूमीसाठी आवश्यक तेवढी जागा घेणेसाठी प्रस्ताव सादर करणेच्या सुचना दिल्या होत्या. याअनुषंगाने सदरची विस्तारीकरणाचा जागा पाहणीसाठी फिरतीचे आयोजन केले होते.
शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी यावेळी महापौरांना विस्तार आराखडयाबाबतची सविस्त माहिती दिली. यासंदर्भात ७ मार्च रोजी पदाधिकाऱ्यांना डीपीआरचे सादरीकरण करु. आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी यावेळी सदरच्या विस्तारीत आराखडयामध्ये उपलब्ध असलेल्या स्मशानभूमी शेजारी स्लॅब टाकून ६० बेडची नविन स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. याठिकाणी अदयावत घाट, पार्किंग व्यवस्था, लाकडे व शेणी ठेवण्यासाठी गोडावून इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असलेचे सांगितले. तसेच नविन स्मशानभूमी सुरु झालेनंतर जुन्या स्मशानभूमीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करुन लगतचा रस्ता मोठा करणार असलेचे सांगितले.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.वनिता देठे, गटनेते शारगंधर देशमुख, आरोग्याधिकारी डॉ.अरुण वाडेकर, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता एस.के.माने, कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे, विनोद पांचाळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!