News Flash

बहिणीचे सोमवारी लग्न अण… भावावर काळाचा घाला

टोप (प्रतिनिधि) : कोल्हापूर सांगली राज्यमार्गवर हालोंडी गावच्या हद्दीत हॉटेल शिवतारा समोर अज्ञात वाहणाने धडक दिल्याने हेरले येथील तरूण जागीच ठार झाला. अभिजीत दिलीप बलवान (रा. हेरले, ता हातकणंगले, वय 25) असे या युवकाचे नाव आहे.
येथील मयत अभिजीत बलवान हा बहिणीच्या लग्नाची सर्व खरेदी झाली असल्याने आता माझ्यासाठी कपडे आणतो असे सांगून आपल्या मोटरसायकल (क्रमांक एम एच 10 ए ए 2726) ने तो गांधीनगरला गेला कपडे खरेदी करण्यातही बाहेर पडला. खरेदी करून गावाकडे परत येत असताना पाठिमागून येणाऱ्या अज्ञात वाहणाने त्याच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. त्यामुळे तो लांब फेकला गेल्याने त्याच्या डोक्यास जोराचा मार लागून प्रचंड रक्तस्त्राव झाला. अपघात झाल्याचे पाहताच नजीकच असणाऱ्या लोकांनी अभिजीतचा जिव वाचवण्यासाठी त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेण्याची धडपड केली. पण रक्तस्राव खुप झाल्याने त्याचा जागिच मृत्यू झाला .
अभिजीत बलवान याच्या बहिनीचे सोमवारी लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे. घर पैपाहुण्यांनी भरून गेले असताना आज नियतीने अभिजीतवर काळाचा घाला घातला. अभिजीतचा अपघात झाल्याचे वृत्त हेरले गावात कळताच नातेवाईक, मित्र मंडळीनी घटनास्थळी धाव घेतली. अभिजीतच्या मृत्युनंतर वडीलांनी केलेला आक्रोश हृदयपिळवटून टाकणारा होता.
या अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्याक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यानी धाव घेवून अपघाताची चौकशी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवला. पोलिस अज्ञात वाहणाचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!