News Flash

जिल्हा कृषी महोत्सवास आजपासून प्रारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी): शेतकऱ्यांना कृषी विकसित तंत्रज्ञान आणि शासकिय योजनांची माहिती मिळावी या मुख्य हेतूने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तथा ‘आत्मा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी महोत्सवास आज प्रारंभ झाला. मेरी वेदर मैदानावर आयोजित या कृषी महोत्सवामध्ये २४० स्टॉल उभारण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन उद्या (रविवार) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कृषी प्रदर्शन, कृषीविषयक परिसंवाद, अनुभवी शेतकरी, उद्योजक यांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान व विचारवंत यांची थेट भेट या महोत्सवात होत आहे. या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांसाठी शंभर स्टॉल मोफत देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शासकीय योजनांसाठी४०, तंत्रज्ञान प्रसार ४०, सेंद्रिय शेतीसाठी २०, खाद्यपदार्थ २० आणि सिंचन सुविधा ४० असे एकुण २४० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात पाणलोटचा जिवंत देखावा, उत्तम जातीची जणावरे, खाद्यपदार्थ स्पर्धा हे प्रमुख आकर्षण ठरत आहे.
संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी, सक्षमीकरण, समूह गटशेती, उत्पादक,कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साखळी विकसित करणे, कृषीविषयक परिसंवाद व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणव्दारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि विक्रेता, खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे या प्रमूख उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!