News Flash

माध्यमिक शिक्षक संघाचा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी): मार्च २०१७ पूर्वीचे थकीत वेतन तसेच अतिरिक्त शिक्षकांचे थकीत वेतन मिळावे या आणि अन्य काही मागणींसाठी कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने आज (शनिवार) शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यतील ४० ते ४५ शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोणतीही चूक नसताना डिसेंबर २०१६, जानेवारी २०१७, फेबु्रवारी २०१७ चे वेतन काम करूनही अद्याप मिळालेले नाही. तसेच अतिरिक्त शिक्षकांचे वेतन थकीत आहे. १५ जुलै २१०७ चा थकीत वेतनासंबंधीचा जी आर रद्द करावा त्यातील पळवाटा न शोधता सर्वांचे थकीत वेतन त्वरीत अदा करण्यात यावे अन्यथा सोमवार दि.१२ मार्च पासून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षक संघाच्या वतीने निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
यावेळी रघुनाथ मांडरे, राजेश वरक, प्रशांत जाधव, संजय सौंदलगे, अनण कशाळकर, बी.डी. पाटील, यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!