News Flash

कोल्हापूर जिल्हा मजूर संघाच्या विविध मागण्यांचे पालकमंत्र्याना निवेदन

गडहिंग्लज प्रतिनिधी :गडहिंग्लज येथे कोल्हापूर जिल्हा मजूर संघातर्फ़े आपल्या विविध समस्या व अडचणींबाबतचे निवेदन आज (शनिवार) रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, कोल्हापूर जिल्हा मजूर संस्थाच्या माध्यमातून अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक सवलती कमी झाल्या असून त्यामुळे संस्था अडचणी आहेत. तरी शासनाने जिल्हा मजुर संघाकडे दहा लाखाची कामे वाटपासाठी यावीत, संस्थेच्या वर्गीकरणासाठी लागणाऱ्या दाखल्यासाठी घालणेत आलेल्या जाचक अटींवर तातडीने स्थगिती द्यावी, डांबरीकरणाची कामे करण्यास मजूर संस्थांना मान्यता द्यावी, जिल्हा परिषदेकडील कामे वाटपाची कामे मजुर संघाकडे द्यावी.आदि बाबी महत्वाच्या असून यांचा लवकरात लवकर विचार करून निर्णय घ्यावा. अशी मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष उदय जोशी यांच्यासह तालुक्यातील विविध मजूर संस्थाचे चेअरमन आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!