News Flash

महागाव येथे ८ मार्चपासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : केदारी रेडेकर फौंडेशनच्या वतीने महागाव येथे ८ ते १० मार्च या कालावधीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. केदारी रेडेकर यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त महागाव येथील शिवाजी चौक मैदानावर या स्पर्धा होणार आहे. प्रो कबड्डीमध्ये सहभाग घेतलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू स्पर्धेचे खास आकर्षण असणार आहे. स्पर्धेकरिता दीड लाख रुपयांची रोख रक्मेची बक्षिसे व आकर्षक चषक याचबरोबर वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सदरच्या स्पर्धा या प्रकाशझोतात होणार आहेत.
ठाणे, कल्याण, मुंबई उपनगर, चिपळूण, नाशिक, नंदुरबार, सडोली, शिरोली, वडणगे, बाचणी, पुणे, इस्लामपूर, कासेगाव येथील नामवंत संघांचा सहभाग असणार आहे. निलेश साळुंखे, गिरीश येरणाक, प्रशांत चव्हाण, नीलेश शिंदे, काशिलिंग आडके, बाजीराव होड़गे, नितिन मदने, कृष्णा मदने, तुषार पाटील, आनंदा पाटील, श्रीकांत जाधव, ऋतुराज कोरवी असे दिग्गज खेळाडू आपल्या खेळाचे झलक दखवणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा असोसिएशन यांच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून राज्य असोसिएशनकडून निरीक्षक म्हणून अण्णा गावडे, कोल्हापूर व पंचप्रमुख म्हणून निवृत्ती आजगेकर (मुंबई) हे काम पाहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!