News Flash

गडहिंग्लजमध्ये आढळला दुर्मीळ ‘चित्रांग नायकूळ’ साप..!

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमध्ये आज (शुक्रवार) सकाळी नऊच्या सुमारास दुर्मीळ ‘चित्रांग नायकूळ’ साप आढळला. नागरिकांनी याची कल्पना सर्पमित्रांना दिल्यावर त्यांनी तो पकडून वनखात्याच्या स्वाधीन केला.
हा साप बिनविषारी, चपळ, देखणा आहे. अशा प्रकारचे साप पंढरपूर, सोलापूर येथे जादा प्रमाणात असते. माळरान किंवा मातीच्या ढिगाऱ्या खाली, झाडावर चित्रांग नायकूळचे वास्तव असते. गडहिंग्लज येथील नदीवेस परिसरात बांधकामाच्या ठिकाणी हा साप आज सकाळी नऊच्या सुमारास हाळमातीच्या ढिगाऱ्याखाली दिसून आला. त्या वेळी नागरिकांनी सर्पमित्र मेहबूब सनदी, नदीम नदाफ, विनायक चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा साप पकडला. त्याला वनखात्याच्या स्वाधीन करण्यात आले. मेहबूब सनदी म्हणाले की, हा साप एक फूट ते तीन फूट असू शकतो. तपकिरी राखाडी रंगाच्या शरीरावर काळी किनार असलेले पिवळे खवले असतात. खवले तोंडाकडे गडद तर शेपटीकडे पुसट असून पोटाकडचा भाग पांढरा असतो. डोक्यावर व्ही आकाराची काळी किनार असते. त्याच्या शरीरावरच्या नक्षीमुळे देखणा आणि चपळ दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!