News Flash

राशिवडे आरोग्य केंद्रामध्ये अनागोंदी : अधिकाऱ्यांना समज देण्याची मागणी

राशिवडे (प्रतिनिधी) : येथील मदर आरोग्य केंद्राचा दर्जा असणाऱ्या राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनागोंदी माजली असून अधिकारी गांभीर्याने कामच करत नाहीत. त्यांना समज द्यावी, अशा मागणीचे निवेदन नारायण पांडुरंग पाटील यांनी आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी कोल्हापुर, जि. प. अध्यक्ष, आरोग्य सभापती जि.प., खासदार संभाजीराजे, खा. धनंजय महाडिक यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राशिवडे प्रा. आरोग्य केंद्रामध्ये पन्नासहून अधिक गावे, वाडयांचा संपर्क येतो. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हजर नसतात. औषधांचा ठणठणाट आहे. कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात व अन्यत्र फिरत असतात. काही दिवसापूर्वी एका बालकाचा रेबीजने मृत्यू झाला होता. ही गंभीर घटना घडूनही या आरोग्य केंद्रामध्ये रेबीजची लस उपलब्ध नाही. प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष घालावे व जनतेच्या जीवाशी खेळू नये. या आधी या केंद्रातील कारभाराबाबत भाजप महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष सौ. संध्या महाजन यांनीही तक्रार केली होती. या तक्रारीचीही दखल घेतलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!