News Flash

ध्येयपूर्तीसाठी अखंड परिश्रम केल्यास यश मिळेल : विश्वास नांगरे-पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आयुष्य हे एकदाच मिळत असते म्हणून आपली ध्येय मोठी ठेवा आणि ध्येयपूर्तीसाठीच झपाटून घ्या, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. अरुण नरके फौंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आज (शुक्रवार) शाहू स्मारक भवन येथे आयोजित ‘संवाद ध्येयवेड्यांसाठी’ व्याख्यानात ते बोलत होते.
ते म्हणाले की, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या तत्वाने ध्येयाची वाटचाल करा. जीवनात आपल्याला काय करायचे आहे याचे प्रथम चिंतन करा आणि त्यानंतरच ध्येय निश्चित करा अशा शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर बरच काही अनुभवायला मिळाले. येथे एखादा आदेश काढला की लगेच मोर्चे निघतात आणि त्यानंतर त्या विषयावर कृती समिती नेमली जाते असेही ते म्हणाले.
या वेळी अरुण नरके, आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके, शिशीकांत सुतार यांच्यासह नरके फौंडेशनचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!