News Flash

जिल्हा बँकेच्या दोन स्वीकृत संचालकांची निवड वैध : उच्च न्यायालयाचा निर्णय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा बँकेचे स्वीकृत संचालक रणजीत कृष्णराव पाटील आणि सौ. अर्चना आनंदराव पाटील यांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने कायम केली आहे. त्यांची नियुक्ती सहकारी कायद्यातील नवीन नियमानुसार नसल्याचा आक्षेप घेत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी ही निवड रद्द केली होती. यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता काल (गुरुवार) यावर न्यायालयाने रणजीत पाटील आणि अर्चना पाटील यांना दिलासा हा निर्णय जाहीर केला.
रणजीत पाटील (रा. मुदाळ, ता. भुदरगड) आणि सौ. अर्चना आनंदराव पाटील (रा. सोळांकूर, ता. राधानगरी) यांची ३१ डिसेंबर २०१५ रोजी जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली होती. मात्र सहकारी कायद्यात नवीन कलमांनुसार स्वीकृत सदस्य निवड करण्याची तरतूद नाही. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचेकडे स्वीकृत संचालकपदी नियुक्ती करणेसाठी परवानगीही घेतलेली नाही, असे आक्षेप घेत दि. १९ जुलै २०१६ रोजी त्यांची निवड रद्द करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात या संचालकांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केले होते, मात्र सहकार मंत्र्यांनी ते फेटाळले होते. त्यामुळे या दोघांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. गुरुवारी उच्च न्यायालयात न्या. धनुका यांच्या खंडपीठाने या दोन्ही संचालकांचे पद कायम ठेवण्याचा आदेश दिला. या निर्णयाने त्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!