News Flash

सलग सुट्ट्यांनिमित्त कोल्हापुरातून जादा शिवशाही बसेस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : धुलिवंदनच्या सुट्टीला जोडूनच शनिवार-रविवारची सलग सुट्टी आल्याने पुण्याहून कोल्हापूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी जादा ४० शिवशाही बसेस फेऱ्यांचे आयोजन एस.टी. विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. हिंजवडी-इचलकरंजी, हिंजवडी-गडहिंग्लज जादा बसेसचीसुध्दा सोय करण्यात आली आहे. तसेच ४ मार्च रोजी कोल्हापूर-पुणे अशा परतीच्या प्रवासासाठी सुध्दा जादा ४० शिवशाही बसेसचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एस.टी.चे कोल्हापूर विभागीय नियंत्रक एस.एस.चव्हाण यांनी दिली.
कोल्हापूर एस.टी. विभागामार्फत सध्या पुणे, मुंबई, हैदराबाद, रत्नागिरी यासह अन्य ठिकाणी शिवशाही बसची सुविधा उपलब्ध आहे. मार्चच्या सुरुवातीलाच वाढत्या उष्णतेमुळे वातानुकूलित प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत चालला आहे. वातानुकूलित बस, आकर्षक डिजिटल बोर्ड, पुशबॅक, आरामदायी सीट, टू बाय टू आसनव्यवस्था, मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही, अनाउन्समेन्ट सिस्टिम अशी अत्याधुनिक सुविधा असलेल्या शिवशाही बसने अल्पावधीतच प्रवाशांचा विश्वास मिळवला आहे. खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी तसेच आरामदायी प्रवासासाठी एस. टी. महामंडळाने विविध मार्गांवर अत्याधुनिक अशा शिवशाही बस सुरू केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!