News Flash

भाजपकडून नारायण राणेंना मंत्रिपदाऐवजी खासदारकीची ऑफर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या २३ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने चार जणांची नावे निश्चित केली आह. यामध्ये मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आणि श्याम जाजू यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना मंत्रिपदाऐवजी राज्यसभेवर जावे अशी ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे.
राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात महाराष्ट्रमधील ६ जागांचा समावेश आहे. राज्यसभेतील कार्यकाळ संपत असलेल्या प्रमुख सदस्यांमध्ये अरुण जेटली, थावरचंद गेहलोत, प्रकाश जावडेकर, जगतप्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान, रविशंकर प्रसाद या सहा मंत्र्यांचा समावेश आहे. संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे ३ उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. २३ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपकडून ४ संभाव्य नावं समोर आली आहेत. देशाचे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची पुन्हा वर्णी लागणार आहे. तर नारायण राणे यांना मंत्रिपदाऐवजी राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आणि श्याम जाजू यांची नावं पुढे येत आहे. जावडेकर तर सध्याही खासदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!