News Flash

अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे मशीनने तुकडे करून फेकले खाडीत…

मुंबई (प्रतिनिधी) : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा निर्घृण खून झाल्याचे अखेर निष्पन्न झाले आहे. अश्विनी यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकल्याची कबुली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरचा मित्र महेश पळणीकर याने दिली आहे.
अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात अभय कुरुंदकर याचा कारचालक कुंदन भंडारी याच्या अटकेनंतर नवी मुंबई पोलिसांनी कुरुंदकरचा बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला पुण्याहून अटक केली होती. या प्रकरणातील ही चौथी अटक होती. कुंदन भंडारी व महेश फळणीकर या दोघांना पनवेल न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली असून चौकशीत फळशीकरने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अश्विनी बिद्रे यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना अटक केल्यानंतर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील यालाही अटक केली होती. कुरुंदकर याला त्याचा चालक कुंदन भंडारी याने मदत केल्याचा संशय असल्याने गेल्या आठवड्यात पोलिसांनी त्यालाही अटक केली होती. भाईंदर येथून ज्या दिवशी अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या, त्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास कुंदन भंडारी याच्या मोबाइलचे लोकेशनसुद्धा त्याच परिसरात असल्याचे तपासात आढळून आले होते. याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने पुण्याहून रात्री उशिरा आल्याने भाईंदर येथील बंटास हॉटेलमध्ये मुक्काम केल्याचे सांगितले होते. मात्र तो हॉटेलमध्ये थांबला नसल्याचे तपासात आढळून आले. ज्या दिवशी अश्विनी बेपत्ता झाल्या, त्या दिवसाचे कुरुंदकर याचे व त्यांचा कारचालक कुंदन या दोघांचे मोबाइल लोकेशन जवळ-जवळ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कुंदनवर संशय बळावला होता. त्यातच या प्रकरणात अटक करण्यात आलेला चौथा आरोपी महेश फळणीकरने आता गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांच्या तपासाला गती मिळाली आहे

2 thoughts on “अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे मशीनने तुकडे करून फेकले खाडीत…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!