News Flash

‘कोल्हापूर सीबीएस’वरील ‘लगेज रूम’मुळे प्रवासी, पर्यटकांत समाधान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटक आणि प्रवाशांना आपल्याजवळचे साहित्य सुरक्षित ठेवून पर्यटनाचा आनंद मनसोक्त घेता यावा, या उद्देशाने मध्यवर्ती बसस्थानकावर ‘लगेज रूम’ ची सोय करण्यात आली आहे. अत्यंत सुरक्षित आणि अल्प दरामध्ये उपलब्ध असलेल्या या सुविधेमुळे पर्यटकांमधून समाधान व्यक्त आहे.
कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय ग्रामीण भागातून दररोज काही ना काही कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मुबलक आहे. कोल्हापूरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना आपल्या बरोबर आणलेल्या साहित्य घेऊनच पर्यटन करावे लागते. तर काही पर्यटक थोड्या वेळासाठी हॉटेल्सवर राहणे पसंत करतात, पण अक्षरश: काही तासांसाठी भरमसाठ चार्जेस द्यावे लागतात. हे लक्षात घेऊन या समस्येवर मात करण्यासाठी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे खाजगी तत्त्वांवर मागील दोन महिन्यांपासून लगेज रूमची सुविधा उपलब्ध करू देण्यात आली आहे. या ठिकाणी आपल्याजवळच्या बॅग ठेवून दिवसभर आपण आपली कामे उरकू शकतो.
दिवसाला एका बॅगसाठी २० रुपये अशा अत्यंत कमी दरामध्ये सुरू केलेल्या या सुविधेमुळे नागरिकांची आर्थिक बचत होणार आहेच, शिवाय बॅग ठेवण्यासाठी शोधावी लागणारी हॉटेल्स व त्यासाठी लागणारा वेळही वाचणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली ही सेवा सी.सी.टी.व्ही कॅमेराबध्द असल्याने अत्यंत सुरक्षित आणि २४ तास सेवेत असल्याने प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर एस.टी.विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!