News Flash

प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेतल्याने विधानसभेत गदारोळ

मुंबई (प्रतिनिधी) : जवान आणि त्यांच्या पत्नींबाबत अतिशय हीन भाषेत वक्तव्य करणारे पंढरपूर येथील अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेतल्याच्या कारणावरून आज (गुरुवार) विधानसभेत गदारोळ झाला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या सुरात राष्ट्रवादीने सूर मिळविला. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप आमदारांनीही जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अखेर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काही वेळ कामकाज तहकूब केले.
सोलापूर जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या प्रशांत परिचारक यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जवान व त्यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आज त्यांचे निलंबन मागे घेतले. याबाबत शिवसेनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. दीड वर्षासाठी निलंबन केलेले असताना वर्षभरातच त्यांचे निलंबन का मागे घेतले असा सवाल शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी विचारला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही आपला आक्षेप नोंदवला. यानंतर परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमुखाने मागणी केली. यानंतर सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षाच्या आमदारांनी एकच गदारोळ सुरू केला. अखेर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज काही काळाकरिता तहकूब केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!