News Flash

छिंदम प्रकरणामुळे नगर उपमहापौर निवडणुकीतून भाजपची माघार

अहमदनगर (प्रतिनिधी) : युगपुरुष, छ. शिवाजी महाराज यांचेबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला भाजपमधून काढून टाकण्यात आले. त्याचा राजीनामा घेण्यात आला. रिक्त जागेवर सोमवार, दि. ५ मार्च रोजी निवडणूक होत आहे. मात्र, छिंदम प्रकरणानंतर भाजपवर असलेली नाराजी लक्षात घेऊन या निवडणुकीसाठी उमेदवार न देण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी आणि शहर जिल्हा पदाधिकारी यांच्या बैठकीत मुंबईत घेण्यात आला.
त्यामुळे उपमहापौर पदासाठी इतर पक्षांना संधी मिळणार आहे. या पदासाठी आज (गुरुवार) अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे गटनेते समदखान, शिवसेनेचे दीपाली बारस्कर, डॉ. सागर बोरुडे यांनी अर्ज भरले आहेत. हे पद मिळविण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!