News Flash

पीएनबी घोटाळाप्रकरणी मेहुल चोक्सीची १२१७ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात पळालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. ईडीने आत्तापर्यंत मेहुल चोक्सीच्या १२१७ कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. मुंबईतील १५ फ्लॅट आणि १७ कार्यालये, कोलकाता येथील शॉपिंग मॉल आणि अलिबाग येथील ४ एकरातील फार्महाऊस, अलिबाग, नाशिक, नागपूर, पनवेल आणि विल्लुपुरम येथील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी येथील १७० एकरांवर पसरलेल्या हार्डवेअर पार्कवरही जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
याआधी नीरव मोदीप्रमाणेच आपल्या वकिलांमार्फत एक पत्र मेहुल चोक्सीने लिहिले आहे. माझ्याबाबत तपास यंत्रणांचा गैरसमज झाला आहे. चौकशीचा आणि तपासयंत्रणांचा ससेमिरा दूर झाला की मी स्वतः तुमची देणी देईन, असेही चोक्सीने त्याच्या पत्रात कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे. ईडीने मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याशी संबंधित १४४ दुकानांवर छापे मारले. यामुळे मी आर्थिक अडचणीत आहे असेही चोक्सी याने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!