News Flash

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना महासमाधी : लाखो भाविकांनी घेतले दर्शन

चेन्नई (वृत्तसंस्था) : तमिळनाडूमधील कांची कामकोटी पीठाचे प्रमुख आणि ६९ वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना आज (गुरुवारी) अंतिम निरोप देण्यात आला. तीन तास चाललेल्या वृंदावन प्रवेश (अंत्यविधी) दरम्यान, सर्वप्रथम त्यांना दूध आणि मधाने अभिषेक करण्यात आला. यानंतर वैदिक यज्ञ-पूजा करून मठाच्या वृंदावन भवनात त्यांना महासमाधी देण्यात आली.
बुधवारी निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव देह मठात ठेवण्यात आले. आज ( गुरुवार) सकाळपासून १ लाखांहून अधिक लोकांनी शंकराचार्यांचे अंत्यदर्शन घेतले. जयेंद्र सरस्वती यांना ६५ वर्षे कांची पीठाची गादी सांभाळली. छातीत दुखायला लागण्यानंतर त्यांना कांचीपूरम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांनी बुधवारी शेवटचा श्वास घेतला. आता त्यांच्या जाग्यावर शंकर विजयेंद्र सरस्वती पदभार संभाळणार आहेत.
मठाचे व्यवस्थापक संदरेशन यांनी सांगितले की, वैदिक विधिनुसार आचार्य यांच्या वृंदावन प्रवेशाची (अंत्यसंस्काराची) तयारी करण्यात आली आहे. या प्रक्रियेस सकाळी ८ च्या सुमारास प्रारंभ झाला. मागील २४ तासात एक लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. जयेंद्र सरस्वती १९५४ साली वयाच्या १९ वर्षी शंकराचार्य बनले होते. यापूर्वी त्यांचे नाव सुब्रमण्यन महादेव अय्यर होते. २००३ मध्ये त्यांनी शंकराचार्य म्हणून ५० वर्षे पूर्ण केली होती. १९८३ मध्ये जयेंद्र सरस्वती यांनी शंकर विजयेंद्र सरस्वती यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले होते. कांची मठाची स्थापना स्वत: आदि शंकराचार्यांनी केली होती. हा कांचीपूरम येथील सर्वात मोठे हिंदू मठ आहे. ५ पंचभू स्थळांपैकी हा महत्त्वाचा मठ आहे. येथील मठाधीश्वराला शंकराचार्य असे म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!