News Flash

…तर भाजपला शेवटचा नमस्कार : चंद्राबाबू नायडू

हैदराबाद (वृत्तसंस्था) : तेलगू देसम एनडीएचा घटक पक्ष आहे. आम्ही भाजपशी असलेला मैत्रीधर्म नेहमीच निभावलाय. केंद्र सरकारने आंध्रप्रदेशाला दिलेली आश्वासने जर पूर्ण केली नाहीत, तर मी भाजपला अखेरचा नमस्कार करून माझ्या मार्गाने निघून जाईन, असा इशारा पक्षाध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.
भाजप मित्रपक्षांना विश्वासात घेत नाही, उलट त्याच्या शत्रूपक्षांशी हातमिळवणी करून मित्रपक्षांना कमजोर करतो, असे आरोप यापूर्वी नायडू यांनी केले होते. भाजप विश्वासघाताचे राजकारण करत असल्याने एनडीएतून बाहेर पडणार असेही सांगितले होते. केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याच्या निषेधार्थ तेलगू देसमच्या खासदारांनी संसदेत गोंधळ घातला होता.
आज पुन्हा चंद्राबाबूंनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. २०१४ मध्ये आंध्रप्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. स्वतंत्र राज्य निर्मितीवेळी आंध्र प्रदेशवर अन्याय झाला आहे. राज्याची घडी नीट बसविण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यात येत आहेत, पण आमच्या मागण्या अजूनही केंद्र सरकारने मान्य केल्या नाहीत तर, मी त्यांना शेवटचा नमस्कार करून माझ्या मार्गाने निघून जाईल, असे चंद्राबाबू नायडूंनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!