News Flash

कॉपीमुक्त दहावीची परिक्षा करण्यासाठी शिक्षकांनी कंबर कसली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची परिक्षा आज (गुरुवार) सुरू झाली. आज दहावीचा पहिला पेपर असल्याने विद्यार्थी मात्र टेंन्शनमध्ये दिसत होते. शिवाय शहरातील काही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेबाबत गोंधळ उडालेला दिसत होता. बैठक व्यवस्था एका शाळेत आणि विद्यार्थी मात्र दुस-याच शाळेत असा गोंधळ निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही तारांबळ उडाली.

आजपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेला सकाळी अकरानंतर एकाही विद्यार्थ्याला परिक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. या निर्णयाची विभागीय मंडळाने काटेकोरपणे अंमलबजावणी केलेली दिसून आली. दहावीचा पहिल्या मराठी पेपरची अकराची वेळ असली तरी सकाळी साडेदहालाच वि़द्यार्थी शाळेत दाखल झाले होते. यावेळी शाळा महाविद्यांलयासह पोलीसांचा कडक बंदोबस्त हे मात्र या वर्षीच्या परिक्षेचे वैशिष्ट्य पहायला मिळाले.

कॉपीमुक्त दहावीची परिक्षा पार पाडण्यासाठी शिक्षकांची फौज प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गखोलींच्या बाहेरच तपासणी करत कॉपी आणली आहेस का ? मोबाईल ठेवला आहेस का ? असे मोठ्या आवाजामध्ये खडसावत होते. त्यामुळे विद्यार्थी परिक्षेचे टेन्शन आणि वर्गाच्या बाहेरच शिक्षकांची दमदाटी यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर भिती दिसून येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!