News Flash

वर्ल्ड कप हॉकी : भारताचा ‘क’ गटात समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान हिंदुस्थानचा सोप्या गटात समावेश करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केले.

यामध्ये भारताचा समावेश ‘क’ गटात करण्यात आला असून या गटात फक्त ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता बेल्जियम हा एकमेव तगडा प्रतिस्पर्धी संघ आहे. आशियाई चॅम्पियन असलेला भारताचा संघ २८ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या स्पर्धेला प्रारंभ करेल. त्यानंतर २ डिसेंबरला बेल्जियमविरुद्ध, तर ८ डिसेंबरला कॅनडाविरुद्ध हिंदुस्थानची गाठ पडणार आहे.

हिंदुस्थानचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात्र गटफेरीत खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ‘ड’ गटात पाकिस्तानसमोर नेदरलॅण्ड, जर्मनी आणि मलेशिया या देशांचे आव्हान असेल. २८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान गटफेरीच्या लढती होतील. १२ आणि १३ डिसेंबरला उपांत्यपूर्व लढती होणार असून १५ डिसेंबरला उपांत्य आणि कास्यपदकाची लढत रंगेल. तर १६ डिसेंबरला विश्वचषकाचा अंतिम सामना रंगेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!