News Flash

सावित्रीबाई फुले रुग्णालयास महापौरांची भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले रुग्णालयास आज (बुधवार) महापौर सौ.स्वाती यवलुजे यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहितीही घेतली. तसेच रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच शहरातील नागरिक आणि आसपासच्या गावातील रुग्णांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

सावित्रीबाई फुले रुग्णालय शहराच्या मध्यवस्तीत असणारे जनरल हॉस्पिटल आहे. याठिकाणी उपचार घेण्यासाठी कोल्हापूर शहरासह आसपासचे खेडेगावातील रुग्णही येत असतात. महापालिकेच्या या हॉस्पीटलमध्ये मेडिसीन, शल्यचिकीत्सा, स्त्री रोग, बालरोग असे वेगवेगळे विभाग कार्यरत आहेत. तसेच लॅब, सोनोग्राफी, क्ष-किरण, सीबी नेट (टी.बी.उपचाराकरिता), ईसीजी यासारख्या सुविधा पुरविल्या जातात. तसेच एचआयव्हीची लागण झालेल्या पेशंटसाठी महत्वाची असणारी व्हायरल लोड या तपासणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

यासह टीबी झालेल्या रुग्णांसाठी मशिनची सुविधा सद्या शहरातील कोणतेही खाजगी हॉस्पीटलमध्ये उपलब्ध नसून हे मशिन केवळ सीपीआर हॉस्पीटल आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे. या रुग्णालयामध्ये येणारे रुग्णांवर मोफत उपचार उपलब्ध करुन दिले जातात. याशिवाय मतिमंद रुग्णांना ५० टक्के खर्चात मोफत उपचार करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, उपमहापौर सुनिल पाटील, परिवहन समिती सभापती राहूल चव्हाण, महिला बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.वनिता देठे, गटनेता शारंगधर देशमुख यांच्यासह पालिकेचे नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!