News Flash

राधानगरी-पिरळ मार्गावरील पुलाच्या कठड्याच्या पाईप चोरीस : वाहतूक बनली धोकादायक

राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी – पिरळ मार्गावर भोगावती नदीवर असणा-या पुलाच्या दोन्ही बाजूच्या संरक्षक कठड्याच्या पाईप चोरीस गेल्यामुळे या पुलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. शिवाजी पूल दुर्घटनेसारखी एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल वाहतूकदारांकडून केला जात आहे.
राधानगरी मुख्यालयास पूर्व भागाला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. त्याचबरोबर हिंडाल्को कंपनीचे वाहतूक करणारे ट्रक देखील याच मार्गावर ये-जा करीत असतात. त्यामुळे हा रस्ता आणि या पुलावर सततची वर्दळ असते. १९९५ साली युती शासनाच्या काळात तत्कालीन आमदार नामदेवराव भोईटे यांच्या प्रयत्नातून या मार्गावर भोगावती नदीवर पूल उभारण्यात आला. मात्र या पुलाची रुंदी कमी ठेवण्यात आली आहे. या पुलावरून नेहमीच एकेरी वाहतूक करावी लागते.
त्यातच चोरट्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला असणा-या संरक्षक पाईप गेल्या काही वर्षात एक एक करीत लांबवल्याने आज पुलावर एकही संरक्षक पाईप शिल्लख नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे मात्र निधी अभावी त्यांचेही हात बांधले गेले आहेत. आज घडीला हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक स्थितीत आहे. याकडे प्रशासने वेळीच लक्ष दिले नाही तर एखादी मोठी दुर्घटना घडण्याची श्याक्याता आहे. सुमारे २० वर्षापूर्वी उभारलेल्या या पुलाचे स्ट्रक्चलर ऑडीट होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!