News Flash

दहावीच्या परीक्षेस उद्यापासून प्रारंभ…

कोल्हापूर : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या मराठीच्या पहिल्या पेपरने उद्यापासून (गुरुवार) सुरूवात होणार आहे. या वर्षी कोल्हापूर विभागात नियमित आणि पुनर्परीक्षार्थी असे एकूण १ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यावर्षी कोल्हापुरातील विभागात असणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण ३५४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी विभागातील १ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता मराठीच्या पेपरने परीक्षेला सुरुवात होईल. परीक्षेतील कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी विभागात शिक्षण मंडळातर्फे एकूण १९ भरारी पथकांची परीक्षा केंद्रांवर नजर राहणार आहे.
परीक्षार्थींनी शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वेळापत्रक पाहावे, सोशल मीडियावरून फिरत असलेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी केले आहे. पवार यांनी सांगितले की, परीक्षेच्या कालावधीत परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. परीक्षा केंद्रांवर पेपरच्या आधी अर्धा तास परीक्षार्थींनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी अकरा वाजता पेपर असणाऱ्या परीक्षार्थींना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल. त्यांना १० वाजून ४० मिनिटांनी उत्तरपत्रिका आणि १० वाजून ५० मिनिटांनी प्रश्नपत्रिका देण्यात येईल. त्यांना अकरा वाजता लिहिण्याची परवानगी दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!