News Flash

वाघवे येथे पोटनिवडणुकीत वहिनीकडूनच दिराचा पराभव…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वाघवे ग्रुप ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार सौ. संपदा अशोक माने यांनी शिवसेनेचे उमेदवार परशुराम माने यांचा १३५ मतांनी पराभव केला. महत्त्वाचे म्हणजे भावजय आणि दीर यांच्यातच लढत असल्याने या निवडणुकीकडे परिसराचे लक्ष लागून राहिले होते.
वाघवे पैकी मानेवाडी येथील वॉर्ड क्र. ३ मध्ये मंगळवार दि. २७ रोजी पोटनिवडणूक झाली होती. यामध्ये ८५३ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. जनसुराज्यच्या संपदा माने यांना ४९४ तर शिवसेनेच्या परशुराम माने यांना ३५९ मते मिळाली. निकालानंतर जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत वॉर्डमध्ये मिरवणूक काढून जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!