News Flash

भारतीय आयुर्वेदातील संशोधन स्वंयपूर्ण होत नाही : डॉ. दिलीप म्हैसकर

कोडोली (प्रतिनिधी) : जागतिक स्तरावरील तुलनेत निधी असूनही भारतीय आयुर्वेदातील संशोधन स्वंयपूर्ण होत नाही. आयुर्वेद उपचार पद्धतीसाठी भारत देशाकडे जग आदराने पहाते. त्याच देशात आयुर्वेदातील संशोधनात प्रगती होत नसल्याची बाब चितांजनक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यानी केले.

ते कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय आणि संशोधन केंद्र येथील पदवी प्रदान सोहळा डॉ.म्हैसेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील होते.

यावेळी म्हैसकर म्हणाले की, आयुर्वेदातील संशोधनाची माहिती (डाटा) संकलीत होत नाही. आजवर झालेल्या संशोधनातील माहिती सुरळीतपणे संकलीत आणि संग्रहीत न केल्याने आयुर्वेदातील संशोधन पुढे जाण्यास अडथळे निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोबाईलचा वापरातील अतिरेक विद्यार्थ्यानी थांबवावा. मोबाईलच्या वापराने आरोग्य बिघडत चालले असून देशातील साठ टक्के जनता मोबाईलच्या वापरात व्यस्त राहू लागल्याचे सन २०१८ च्या जागतिक आवाहलात स्पष्ट नमूद केले असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवी पूर्ण शिक्षण घेतलेल्या ८५ विद्यार्थाना कुलगुरू डॉ.म्हैसेकर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील पीएचडी (डॉक्टरेट) मिळवलेल्या शिक्षकांना गौरवण्यात आले.

यावेळी नवी दिल्लीच्या भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेचे सदस्य डॉ. सुर्यकिरण वाघ, विनिता पाटील, व्ही.डी. पाटील यांच्यासह आयुर्वेदिक महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!