News Flash

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या मागण्या मान्य : विनोद तावडे

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ‍कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने १२ वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या संघटनेसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करुन, या संघटनेच्या मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज (बुधवार) विधीमंडळात एका निवेदनाच्या मार्फत दिली.

शासनाने शासन हिस्सा म्हणून १,१८२ कोटी रुपये आणि कर्मचाऱ्यांचा मासिक अंशदान तसेच यावरील व्याजाची रक्कम रुपये १३० कोटी एवढी रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सुमारे ५० हजार २६ प्राथमिक शाळांमधील आणि ४७ हजार २९२ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परिभाषित अंशदायी योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये अंशदानाची आणि व्याजाची रक्कम जमा होणार आहे. कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या (इंग्रजी माध्यम) वगळून उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या वर्ग-तुकड्यांच्या पहिल्या टप्यातील वर्ग-तुकड्या घोषित करण्यात आली आहे. यामध्ये १२३ उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि २३ उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील अतिरिक्त शाखा, तुकडयांचा समावेश असल्याची माहिती तावडे यांनी विधीमंडळाच्या सभागृहात दिली.

तसेच महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण संघटनेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी १२ वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर घोषित केलेला बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहनही तावडे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!