News Flash

स्वाभिमान गहाण तर रयत रस्त्यावर…

कोल्हापूर (संदीप बिडकर) : स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते आता रस्त्यावरील लढाईत उतरले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खा. राजू शेट्टी यांची माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्याशी वाढलेली जवळीक पाहता शेट्टी यांनी स्वाभिमान गहाण टाकला आहे की काय ? अशी शंका त्यांना निवडणून देणा-या मतदारांमध्ये उमटू लागली आहे. तसेच स्वाभिमानीच्या कोट्यातून सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाले असले तरी सध्या ते शेतक-यांच्या प्रश्नांपेक्षा सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात काम करताना आढळून येतात. त्यामुळे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे रयत आता रस्त्यावरच आढळून येत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी संघटना वाढवण्यासाठी अक्षरशः जीवाचे रान केले. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात अक्षरशः रान उठवले. शेवटी भाजपाशी समझोता करुन भाजप-सेना सत्तेमध्ये स्थान मिळवले. खा. राजू शेट्टी पुन्हा हातकणंगले मतदार संघातून निवडून आले. तर सदाभाऊ खोतही राज्य कृषीमंत्री म्हणून वर्णी लागली. शेतकरी विरोधात धोरण राबवीत असल्याचे कारण पुढे करुन शेट्टी सरकारमधून ते बाहेर पडले. पण त्यांचेच सहकारी सत्तेची ऊब लागल्याने सदाभाऊ मंत्रीपदावर राहिले. परिणामी संघटनेने त्यांची हकालपट्टी केली. आणि त्यांनी नवीन रयत क्रांती संघटना काढली.

सध्या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये प्रामुख्याने काही दिवसांपूर्वी सदाभाऊंच्या गाडीवर दगडफेक झाली. याचा परिणाम म्हणून रयत क्रांती पक्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयावर दगडफेक करुन बांगड्यांचा आहेर देण्यात आला.

शेतक-यांच्या प्रश्नांसाठी भांडणारे दोन कार्यकर्ते आता मोठे नेते झाले आहेत. पण त्यांना आता सत्तेची ऊब लागली आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. जर शेतक-यांच्या प्रश्नांसाठी एकत्रीत येऊन काम करण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व संपवण्यासाठी जर रस्त्यावरील लढाई लढत असतील तर त्यांना बळ देणा-या सर्वसामान्य शेतक-यांनी पहायचे तरी कुणाकडे. कारण शेतक-यांच्या जीवावरच हे दोघे मोठे नेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता येणा-या निवडणूकीत शेतकरी मतदार राजा जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!