News Flash

उद्योजक ब्रिजलाल लालवाणी यांचा रविवारी नागरी सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरचे ज्येष्ठ उद्योजक आणि कोल्हापूर सिंधी समाजाचे अध्यक्ष ब्रिजलाल लालवानी यांचा त्यांनी केलेल्या कार्याचा ‘अमृतमहोत्सव’ सोहळा रविवार (दि.४) शाहू स्मारक भवन येथे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी महापौर स्वाती यवलुजे यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिजलाल लालवानी यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. या सोहळ्याला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार उपस्थित राहणार असल्याची माहीती समिती अध्यक्ष अनंत सरनाईक यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

आपल्या वडीलांच्या आईस कॅंडी फॅक्टरीपासून सुरूवात केलेल्या लालवानी यांनी कोल्हापूर शहरात पेरीना आईस्क्रीम फॅक्टरी आणि पेरीना कोल्ड्रींक्स नावाने जवळपास १०१ प्रकारच्या आईस्क्रीम्सची कोल्हापूरकरांशी तोंड ओळख करुन दिली. शिवाय त्यांचे औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या योगदानाची कधीही प्रसिध्दी केली नाही. अशा ज्येष्ठ व्यक्तीमत्वाचे उचित सन्मान झाला पाहिजे. तसेच आणखी चांगले काम त्यांच्या हातून घडावे यासाठी यासाठी त्यांना ऊर्जा मिळावी या हेतूने त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी अमृत महोत्सव सत्कार समिती गठीत करण्यात आली आहे.

यामध्ये ललित गांधी, अॅड.धनंजय पठाडे, अमोल कोरगावकर, डॉ. श्रीकांत कोले, मदन चव्हाण, जितेंद्र गांधी, मेजर संजय शिंदे, सदाभाऊ शिर्के यांचा समावेश असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!