News Flash

चुलबुली ‘चांदनी’ अखेर पंचत्वात विलीन…

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या नृत्यकौशल्य, सौंदर्य आणि अभिनयाने जगभरातील चाहत्यांच्या हृदयसिंहासनावर प्रदीर्घ काळ राज्य करणारी श्रीदेवी सर्वांना चटका लावून पंचत्वात विलीन झाली. आज (बुधवार) सायंकाळी ठीक ५ वा. १३ मिनिटांनी पती बोनी कपूर यांनी तिला मुखाग्नी दिला आणि विलेपार्ले स्मशानभूमीत उपस्थित असलेल्यांच्या हृदयाचा बांध फुटला.
शनिवारी रात्री दुबईतील एक हॉटेलमध्ये स्नानगृहातील टबमध्ये बुडून श्रीदेवीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिचे पार्थिव मंगळवारी संध्याकाळी कपूर कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आले. श्रीदेवी यांचे पार्थिव रात्री सुमारे साडेदहा वाजता त्यांच्या अंधेरीतील लोखंडवाला कॉम्पलेक्समधील निवासस्थानी आणले. ही माहिती मिळताच कपूर कुटुंबीयांचे आप्तेष्ट तसेच शेकडो चाहत्यांनी गर्दी केली. आज सकाळी ९.३० ते १ पर्यंत अंधेरी सेलिब्रेशन क्लबमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी चित्रपटसृष्टीतील विविध कलाकारांनी दर्शन घेऊन तिला आदरांजली वाहिली. पांढऱ्या फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून तिची अंत्ययात्रा काढण्यात आली. देशभरातून आलेले शेकडो चाहते यामध्ये सामील झाले होते. शासकीय इतमामात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!