News Flash

पिंपळगावात राष्ट्रवादी-शिवसेनेचे एकमेकांच्या विरोधात रास्तारोको…

पिंपळगाव (प्रतिनिधी) : पिंपळगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शिवाजीनगर एसटी स्टँड येथे गटर्स बांधणीचे काम सुरु आहे. पण हद्दीच्या वादावरुन हे काम काही दिवस बंद आहे. यावरून विद्यमान सरपंच विश्वनाथ कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव विभाग राष्ट्रवादी आणि त्यांच्या विरोधात शिवसेना भुदरगड उप तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वात पिंपळगाव विभाग शिवसेनेने रास्तारोको आंदोलन झाले.

यावेळी भुदरगड पोलिस ठाण्यातील पोलिस फौजेफाट्यासह हजर होते. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंते जमादार उपअभियंते मेनसे हजर होते. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा थांबवल्या.

यावेळी विश्वनाथ कुंभार म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले काम प्रामाणिकपणे केले असते तर आज आंदोलनाची वेळ आली नसती. पिंपळगाव हे विभागातील प्रमुख ठिकाण असल्याने पिंपळगाव स्टँड परिसर कायम गर्दीने गजबजलेला असतो. त्यामुळे एसटी स्टँडवरील झालेली अतिक्रमणे निघालीच पाहिजे. तसेच दोन्ही रस्त्याच्या बाजूने गटर्स व्हावीत, अशी जर विरोधकांची भूमिका असेल तर मी आणि माझा पक्ष त्याचे स्वागतच करीन, असे सांगितले.

यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते विद्याधर परीट म्हणाले, आमच्या हद्दीतून अर्धा रस्ता आला आहे. राजकीय स्वार्थापोटी जर कोण कारवाई करत असतील तर कुणाचीही गय करणार नसल्याचे सांगितले. तसेच यावेळी दोन्ही पक्षांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!