News Flash

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन

कांचीपुरम (वृत्तसंस्था) : कांची कामकोटी पीठाचे ६९ वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती (वय ८२) आज (बुधवार) सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. काही काळापासून त्यांची तब्येत खालावली होती. गेल्या महिन्यात श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
जयेंद्र सरस्वती यांचा जन्म १८ जुलै १९३५ रोजी झाला होता. त्यांचं मूळ नाव सुब्रमण्यम महादेव अय्यर असं होतं. १९५४ रोजी कांची पीठाचे माजी शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती यांनी त्यांची वारसदार म्हणून निवड केली होती. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या निधनानंतर विजयेंद्र सरस्वती हे शंकराचार्य पदाचे पुढील वारसदार आहेत. कांची कामकोटी मठ हा कांचीपुरम येथील हिंदू मठ आहे. कांची मठाच्या प्रमुखांना शंकराचार्य म्हटलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!