News Flash

आयएनएक्स मीडिया लाचप्रकरणी कार्ती चिदंबरमला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयएनएक्स मीडियाकडून १० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याला अटक केली आहे. आज (बुधवार) सकाळी ८ च्या सुमारास सीबीआयने त्याला चेन्नई विमानतळावरून त्यांना ताब्यात घेतले.
या आधीही कार्ती यांच्या घरावर आणि कार्यालयांवर अनेकदा सीबीआयनं छापे टाकले आहेत.
‘आयएनएक्स मीडिया’ला परदेशातून पैसे मिळवता यावे, यासाठी ‘एफआयपीबी’ या सरकारी संस्थेकडून परवानगी मिळाली होती. त्या वेळी चिदंबरम गृहमंत्री होते, याचाच फायदा घेऊन कार्तीने परदेशातून पैसे घेतले आणि पैशांचा गैरव्यवहार केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी ते सीबीआयला सहकार्य करत नव्हता. त्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली आहे. पी. चिदंबरम हे सध्या लंडनमध्ये आहेत. पण मुलाच्या अटकेची बातमी मिळताच ते भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!