News Flash

जिल्हा परिषदेतील औषध भांडार प्रमुख दोन महिने अनुपस्थित ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जि.प.च्या आरोग्य विभागातील झालेला औषध खरेदी घोटाळा नव्या वळणावर जात आहे. याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांच्यावर याचा ठपका ठेऊन सक्तीच्या रजेवर जाण्यास भाग पाडले आहे. परंतु औषध भांडार प्रमुख बी.डी.चौगुले दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेत फिरकलाच नसल्याचे धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जि.प.च्या आरोग्य विभागाने गेल्या वर्षभरात तीन कोटी रुपयांची औषधे खरेदी केली. शासनाच्या यादीवरील ५६० औषधां व्यतिरीक्त अन्य कंपन्यांचीही औषधे खरेदी केली आहेत. शासन कराराच्या कांही थोड्याच याद्या विचारात घेऊन औषध खरेदी केली असती तर जि.प.चे १६ लाख रुपये वाचले असते. याबाबत जानेवारीत हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ते दाबण्याचा प्रयत्न झाला. परंतु माध्यमांच्या सहभागामुळे याबाबत चौकशी करण्यास भाग पडले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी चौकशी अहवाल वित्त विभागाकडे सोपवून छाननी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!