News Flash

तमिळनाडूचा ‘निवेतन राधाकृष्णन’ खेळणार ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : वयाच्या आठव्या वर्षात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणारा तमिळनाडूचा क्रिकेटर निवेतन राधाकृष्णन आता ऑस्ट्रेलियाकडून अंडर १६ संघात खेळणार आहे. १५ वर्षीय निवेतन राधाकृष्णनला येणाऱ्या सीझनसाठी अंडर १६ संघात सामाविष्ट करण्यात आलेय. निवेतनचे वैशिष्ट्य म्हणजे तो दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो. ज्युनियर लेव्हलला तो तमिळनाडूकडून खेळलाय. मात्र २०१३ मध्ये त्याचे आई-वडिल ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले. त्यानंतर त्याचे नाते ऑस्ट्रेलियाशी जोडले गेले.

निवेतन हा सिडनीमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून खेळलाय. आता त्याची निवड ऑस्ट्रेलियाच्या अंडर १६ संघात झाली आहे. निवेतनच्या मते त्याचे स्वप्न सत्यात उतरतेय. या स्तरावर चांगली कामगिरी करुन मी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करेन, असे सांगितले. याआधी निवेतनने १४ व्या वर्षात तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केले. मात्र तो खरा चर्चेत आला आठव्या वर्षी. चेन्नईमध्ये खेळत असताना टीएनसीएच्या लोअर डिव्हीजन लीग सामन्यात हॅटट्रीक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!