News Flash

नरके फौंडेशनतर्फे २ मार्चला ‘संवाद ध्येयवेड्यांसाठी’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अरुण नरके फौंडेशनच्या वतीने सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नरके फौंडेशनच्या वतीने संवाद ध्येयवेड्यांसाठीचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे शुक्रवार (दि.२) दुपारी ४ वाजता शाहू स्मारक भवन (दसरा चौक) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी गेली १७ वर्षे सुरु असलेल्या कै. सुनिता नरके स्मृतीदिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी डॉ.राम शेवाळकर, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (मुंबई), विद्यापिठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, प्रा.डॉ. विना देव, प्रा. मिलिंद जोशी, माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यासारख्या दिग्गजांच्या व्याखानाचे आयोजन केले आहे. त्याच धर्तीवर फौंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या खास मार्गदर्शनपर व्य्ख्यानाचे आयोजन केले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे फौंडेशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!