News Flash

भोगावतीमध्ये ऊसतोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक

भोगावती (प्रतिनिधी) : भोगावती सहकारी सारवर कारखान्यातर्फे कुरूकली येथे ऊसतोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. भोगावतीने आगामी हंगामात यंत्राद्वारे ऊसतोडणी करण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने कारखान्याचे माजी संचालक वसंतराव पाटील यांच्या शेतावर या यंत्राचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

शक्तीमान कंपनीतर्फ प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. चार फुटांच्या सरीमध्ये ऊसलागण केल्यास ऊसतोडणी सोयीची होते. या यंत्राद्वारे ऊसाची तोडणी करून तुकडे करून ते ट्रॉलीत भरले जातात. ऊस जमीनी बरोबर तोडला जातो, त्यामुळे उत्तारा चांगला राहतो. ऊसाचा पाला बारीक करून पसरला जातो. त्याचा सेंद्रीय खत म्हणून वापर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील (कौलवकर) यांनी केले.

यावेळी गोकुळचे संचालक पी.डी.धुंदरे, काररवान्याचे कार्यकारी संचालक ए.व्ही.निकम, भोगावती शिक्षण मंडळाचे संचालक मच्छींद्र पाटील, पी.बी.कवडे, शिवाजीराव तळेकर, वसंतराव पाटील, शत्रुघ्न पाटील, एस.बी.चरापले, दुधगंगा वेदगंगा कारखान्याचे संचालक अशोक कांबळे यांच्यासह ऊसउत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!