News Flash

तपासनीसाने बेपर्वाईने पिंपळगावच्या इंजीनिअरिंगच्या ‘पास’ विद्यार्थ्यास केले ‘नापास…

पिंपळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या इंजिनिरिंगच्या परीक्षेत दुसऱ्या वर्षाच्या हायड्रोलिक इंजिनिअरिंग या विषयाच्या पेपर तपासणीमध्ये पेपर तपासनीसाच्या निषकाळजीपणा व चुकीमुळे विद्यार्थ्यास उत्तीर्ण असतानाही अनुत्तीर्ण करण्याचा प्रकार घडला आहे. परीक्षा बोर्डाकडे झेरॉक्स उत्तरपत्रिकेची मागणी केल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे आता या विद्यार्थ्यांला बांद्रा (मुंबई) येथील बोर्डाच्या मुख्य कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार आहेत
इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग कॉलेज, गारगोटी या कॉलेजच्या वैभव बळवंत मिसाळ (रा.पिंपळगाव) याने हिवाळी सत्र २०१७ मध्ये दुसऱ्या वर्षीची दुसरी सत्र परीक्षा दिली होती. सदर परीक्षेचा निकाल ३ जानेवारी २०१८ रोजी परीक्षा विभागाने जाहीर केला. वैभवला हायड्रोलिक या विषयात १०० पैकी ३४ गुण मिळाल्याची गुणपत्रिका मिळाली. केवळ ६ गुणांनी अनुत्तीर्ण झाल्याने सदर विद्यार्थ्याने रीतसर फी भरून परीक्षा बोर्डाकडे उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रतीची मागणी केली. सदर झेरॉक्स उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर त्याला धक्काच बसला. बोर्डाकडून मिळालेल्या गुणपत्रिकेवर ३४ गुण, तर प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेवर २७ गुण लिहिलेले आहेत.
दुसरा धक्कादायक प्रकार म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तरे बरोबर असतांनाही पेपर तपासनीसाने उत्तरे चूक दाखवून शुन्य गुण दिले. सदर विद्यार्थ्याने ही उत्तरपत्रिका आपल्या कॉलेजमधील शिक्षकांना दाखविली असता पेपर तपासनीसाच्या निष्काळजीपणामुळे २५ ते ३० गुणांची उत्तरे बरोबर असतानाही चूक दिल्यामुळे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे मान्य केले. केवळ पेपरतपासनीसाच्या डोळेझाकपणामुळे उत्तीर्ण विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरला आहे .ही पेपर तपासणी चूक कॉलेजच्या प्राचार्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी विद्यार्थ्यास बांद्रा (मुंबई) येथील परीक्षा बोर्डाच्या मुख्य कार्यालयाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यास मुंबईला जाऊन परीक्षा बोर्डाची चूक त्यांच्या निदर्शनास आणून दयावी लागणार आहे. सदर उत्तरपत्रिकेतील चूक परीक्षा बोर्डाने मान्य केल्यास विद्यार्थ्यावरील अन्याय दूर होणार आहे, अन्यथा परीक्षा बोर्डाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा या विद्यार्थ्याने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!